दोशी इंजिनियर्स करंडक क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विजय

। पुणे । प्रतिनिधी ।
पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत ऍलन रॉड्रिक्स (4-16) याने केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाचा डाव 26.4 षटकात सर्वबाद 100 धावावर संपुष्टात आला. यात धीरज फटांगरेने 44 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी संघाने 22 षटकात 4 बाद 104 धावा करून पूर्ण केले. यात सूरज गोंड नाबाद 29, पवन शह 26, टिळक जाधव नाबाद 11 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर ऍलन रॉड्रिक्स ठरला.
येवलेवाडी येथील ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर झालेल्या लढतीत अजित बगाडी(5-33) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयंटस स्पोर्ट्स अकॅडमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स अकादमी संघाचा 97 धावांनी पराभव केला.

Exit mobile version