तळोज्यात पाणी गळती

| पनवेल | वार्ताहर |

पेंधर गाव आणि सिडको गृहनिर्माण सोसायटी लगत असलेल्या मसिडकोफच्या जलवाहिनी मधून मोठया प्रमाणात होत असलेल्या पाणी गळतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तळोजा वसाहतीतील अनेक सेक्टर मधील रहिवाशांना आजही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. या पार्श्‍वभूमीवर तळोजा फेज-2 लगत पेंधर गाव आणि सिडको गृह निर्माण सोसायटी लगत असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होत असून, पाणी गळतीमुळे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, मसिडकोफच्या जलवाहिनी मधून मोठया प्रमाणात होत असलेल्या पाणी गळतीकडे सिडको पाणी पुरवठा विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी पेठाली गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन केणी यांनी केली आहे.

Exit mobile version