म्हसळा तालुक्यात पाणी टंचाई

दूर करण्यासाठी शासन सज्ज
| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्याला सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत टंचाईची झळ लागते. ही झळ बसणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आ. आदीती तटकरे यांनी 21 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे. तालुक्यातील संभाव्य युक्त टंचाईग्रस्त कुडगाव कोंड,खारगाव खुर्द,रोहीणी,खारगाव बु.,आडी ठाकूर, गायरोणे, खामगाव, गडदाब, आंबेत, सुरई, निगडी, दगडघूम, लेप गौळवाडी, वाघाव बौध्दवाडी, कृष्णनगर नवीवाडी आंबेत, सकलप कोंड, आगरवाडा बौद्धवाडी, आगरवाडा आदीवासी वाडी, खामगाव गौळवाडी, सोनघर, खामगाव मोहल्ला, कासर मलई, जिजामाता हायस्कूल, पेढांबे आदीवासी वाडी, पाभरे बेटकरवाडी, चिचोंडे अशी 15 गावे आणि 12 वाङ्यांचा आराखडयात समावेश आहे.

त्यासाठी सुमारे 21लक्ष रुपयांचा निधी मंजुर केलाआहे.यामध्ये नव्याने विंधण विहीरी खोदणे विहीरींची खोली वाढविणे आसा कार्यक्रम रहाणार आहे. तालुक्यात मागील सुमारे चार वर्षांत राष्ट्रीय आणि ग्रामिण पेयजल कार्यक्रम, भारत निर्माण योजना, जल जीवन मिशन अशा विविध योजनाद्वारे 64 गाव वाङ्यातून सुमारे 410 कोटीचा निधी मंजुर करून आणला आहे.

Exit mobile version