। रायगड । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब, अलिबाग आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय येथील एकूण 174 विद्यार्थ्यांची तपासणी झाली.
रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदू , तिरळेपणा, डोळे येणे, खुपर्या वाढणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे आणि डोळ्यांच्या इतर समस्यांवर उपचार आणि काळजी, डोळ्यांची निगा कशी राखावी, स्वतःबरोबरच घरातील इतरांनी आपला आहार कसा ठेवावा, याबाबत डॉ शुभदा कुडतलकर यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात एकूण 174 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात रेटिनाचे 2, तिरळेपणाचे 3 , इतर 1 अशा 23जणांमध्ये नेत्रविकार आढळून आल्याने मोफत उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. यावेळी लायन्स अलिबाग प्रेसिडेंट अॅड. गौरी म्हात्रे, सेक्रेटरी महेश कवळे, ट्रेझरर अंकिता म्हात्रे, जॉईंट सेक्रेटरी नितीन शेडगे, नयन कवळे, फर्स्ट व्हीपी प्रदीप नाईक, गिरीश म्हात्रे, अविनाश राऊळ, परेश भतेजा, मनोज ढगे, माध्यमिक विद्यालय कुरुळच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे सुजित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कुरुळ शाळेतील शिक्षकांचे सहकार्य आणि प्रसन्न वातावरण सर्वांनाच आनंद देऊन गेले.