| पनवेल | वार्ताहर |
आगामी दहिहंडी व गणेशोत्सव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांनी शांततेत व शासनाच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजपूत यांनी सांगितले की, सर्व मंडळी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे गणेश उत्सव मंडळाची व दहीहंडी उत्सव मंडळांची नोंदणी करावी. सर्वांनी ऑनलाईन अर्ज भरणे, जागामालक किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून मंडपासाठी परवानगी घेणे, तात्पुरते विद्युत कनेक्शन घेणे, मंडप मजबूत असावे याबाबत तज्ञ अथवा अभियंता यांच्याकडून तपासणी करून घ्यावी, ध्वनी प्रदूषण संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, मिरवणुकीत रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे, सर्व संबंधित विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक, मंडळाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमणे, नवी मुंबई पोलीस व्हाट्सप सर्वांनी फॉलो करावे. तसेच, सायबर क्राईम जनजागृतीच्या अनुषंगाने योग्य त्या सूचनांचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील, पो.नि. जगदीश शेलकर व गोपनीय विभागाचे कुँवर आदी उपस्थित होते.