| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर- 34 आणि सेक्टर-35 मध्ये गेल्या 15 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ’सिडको’ने परस्पर पाणी कपात केली आहे का?, असा प्रश्न खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 भाग उंच इमारतीचा परिसर म्हणून परिचित आहे. त्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील हौसिंग सोसायटींमध्ये अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील साई हरिद्रा, कृष्णा मॅजेस्टी, स्मित, केशव रेसिडेन्सी, इनोव्हेटिव्ह कॉर्नर, कृष्णा मॅजेस्टी, गॅलेक्सी, साई सॉलिटर आदी अनेक हौसिंग सोसायटींमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील नागरिकांना टँकर मधील पाध्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.
’सिडको’च्या हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असताना खारघर सेक्टर- 34 आणि सेक्टर-35 मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत, असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, याबाबत ’सिडको’ च्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, ’मागील आठवड्यात नवी मुंबई महापालिकेने जलवाहिनीच्या कामासाठी शट डाऊन घेतले होते. त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्यामुळे खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मधील गृहनिर्माण सोसायटींमध्ये मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा झाला होता. दरम्यान लवकरच खारघर सेक्टर-34 आणि सेक्टर-35 मध्ये पाणी पुरवठा पूर्वी प्रमाणे सुरळीत होणार आहे, असे ’सिडको’च्या पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.