शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुखांकडून टँकरने पाणी पुरवठा

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढली आहे. त्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्यावतीने टँकर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, खासगी तत्त्वावर देखील अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 43 ठिकाणी टँकर पाठवून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

कर्जत तालुक्यात यावर्षी ग्रामीण आणि दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या तालुक्यात शासनाच्यावतीने तब्बल 30 गावे वाड्या या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरचे साहाय्याने पुरविले जात आहे. त्यानंतर देखील शासनाच्या यादीमध्ये टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समावेश नसल्याने अनेक गावे वाड्या यांना शासनाचे टँकर पाठवता येत नाहीत. त्या ठिकाणी तसेच, भीषण पाणी टंचाई जाणवत असलेल्या ठिकाणी खासगी व्यक्तींकडून पाण्याचे टँकर सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 43 ठिकाणी पाण्याचे टँकर पाठवले जात आहेत. त्यात काही आदिवासी वाड्या आहेत, तर काही ठिकाणी गावे तर काही ठिकाणी मोठ्या सोसायट्या यांना पाण्याचे टँकर पुरविले जात आहेत.

तालुक्यातील मिरचूलवाडी, बोरीचीवाडी, कळंब कुंभार आळी, दिवाळवाडी, मेंगाळवाडी, टेपाचीवाडी, वडाचीवाडी, पादिरवाडी, चाफेवाडी, पेटारवाडी, काठेवाडी, अंभेरपाडा, ओलमन, झूगरेवाडी, बोडशेत, पेंढरी, कोतवालवाडी, पाचखकवाडी, धनगरवाडा, नवसूचीवाडी, करकुलवाडी, हरयाचीवाडी, जांभूळवाडी, गुढवन, सराईवाडी, खानद पिंगलस, फणसवाडी, भक्ताचीवाडी, मोग्रज, जांभूलवाडी, धामणी, उक्रुल समृध्दी कॉम्प्लेक्स डीकसल, आषणेवाडी, उमरोलीवाडी, खरबाचीवाडी, धोत्रेवाडी, लोभेवाडी, धोत्रे, धारेवाडी, चांधई या ठिकाणी टँकर पाठवले जात आहेत.

Exit mobile version