। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागोठणे एमआयडीसी येथील मुख्य जलवाहिनीचे काम सुरु असल्यामुळे गुरुवार (दि.12) व शुक्रवारी (दि.13) दोन दिवस अलिबाग शहराचा सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे अलिबाग शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.
तसेच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.