| म्हसळा । वार्ताहर ।
कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा याच्यावतीने बॅरिस्टर ए. आर. अंतुले स्मृती चषक जिल्हा स्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा शनिवारी (दि.14) होणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000, चषक, प्रशस्तीपत्र आणि पदक तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 7,500, चषक, प्रशस्तीपत्र आणि पदक देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मुश्ताक अंतुले, आर. सी. घरत, अशोक तळवटकर, वंदना विचारे, प्रशांत स्वामी, अमित शेडगे, महाविद्यालय विकास समितीचे विश्वस्त सचिव प्रतिनिधी फजल हळदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य महादेव पाटील, सदस्य निलम वेटकोळी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या स्पर्धेत जिल्हातील मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्पर्धा समन्वयक प्रा. सुमित चव्हाण आणि क्रिडा समिती अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेंद्रे यांनी केले आहे.