| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.19) जलशुद्धीकरण केंद्र तसेच गारंबी व सवतकडा धरण येथे देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांनी केले आहे.







