| पाताळगंगा | वार्ताहर |
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आसल्याने या तापमानाची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. या उन्हाच्या पाऱ्यामुळे मुक्या प्राण्यांनाही उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. पंखा, कुलर, ए.सी.च्या माध्यमातून माणूस गारवा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मुक्या प्राण्यांना पाण्यात गेल्याशिवाय गारवा मिळत नाही. यामुळे गुरे पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागामध्ये जनावरे बांधण्यासाठी झाडाच्या खाली बांधले जाते. परंतु सावली एका ठीकाणी स्थिर नसल्याने यांचा फटका मुक्या पाण्यांना बसत आहे. उन्हाच्या झळा असह्य होत असताना. आपल्या शरिराला थंडावा मिळवण्यासाठी या उद्देशाने पाण्याच्या आधार घेत असल्याचे दृश्य सध्या आनेक ठीकाणी पहावयास मिळत आहे.