| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा येथील प्रवेशव्दाराजवळील अचानक मैदानाजवळ असलेल्या टाकेदेवी चालक मालक संघटनेच्या वाहनचालकांनी त्यांच्या कार्यालयाजवळ मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोईं सुरु केली तर जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा उभारला आहे. वाहनचालकांच्या या कार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथे पाणी पिण्यासाठी रोजच मोठ्या संख्येने मुकी जनावरे येत असतात. दुपारच्या उन्हाने व्याकूळ झालेली ही मुकी जनावरे पाण्याच्या शोधात इतरत्र फिरु नयेत यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोईं सुरु केली असून दमूण थकून आलेले नागरिकांना आराम मिळावा यासाठी कट्टा उभारल्याचे टाकेदेवी चालक मालक संघटनेच्या वाहनचालकांनी सांगितले. पाण्यासारखे पुण्य नाही हे येथील प्रशांत मोकाशी, नरेश गुडसे, प्रिंस नागे, प्रकाश म्हात्रे, अभितअली कादरी, बाबू यांच्यासह त्यांचे सहकारी चालक प्रशांत तांबोळी, पंढरीनाथ कुरंगळे, आदीत्य सोमण, रहिम पठाण यांनी लक्षात घेतले त्यांनी मुक्या जनावरांची तहान भागावी म्हणून मोहोपाडा टाकेदेवी चालक मालक संघटनेच्या कार्यालयाजवळ पाणपोई सुरु केली आहे. तर नागरिकांसाठी आरामदायी कट्टा उभारल्याने वाहनचालक संघटनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहोपाड्यात मुक्या जनावरांसाठी उभारली पाणपोई
