| पनवेल | प्रतिनिधी |
मुंब्य्राकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव क्रेनची रस्त्यावर पाणी विकणाऱ्या व्यक्तीला धडक लागल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावरील धानसर येथील शिळफाटा टोलनाक्याजवळ घडली.
तळोजा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. राजू भोसले (48) असे या पाणी विक्रेत्याचे नाव असून, तो मुंब्रा-पनवेल मार्गावरील शिळफाटा टोलनाक्याजवळ राहत होता. तसेच तो टोलनाक्यावर पाण्याच्या बाटल्या विकण्याचे काम करत होता. राजू तेथील टोल नाक्यान थांबणाऱ्या वाहन चालकान पाणी विकण्यासाठी रस्त्यावर उभा असताना, पनवेलच्या आने येणाऱ्या भरधाव क्रेनची राजू भोसले याला धडक लागली. यात राजू गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.