‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

| चिरनेर | प्रतिनिधी |

अमन कैलास वास्कर आयोजित ‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार प्रीमियर लीग’ दिवस-रात्र क्रिकेट सामने कुंडे वहाळ गावाच्या औटी मैदानावर पार पडले. या स्पर्धेत डी.पी. फायटर्स, बहिरीनाथ कलाप्रेमी चॅनेल, ए.एन. क्रिएशन, ए.बी. इंडियन्स, टीम अगाव आणि रोशन अण्णाची कॉमेडी, सृष्टी स्पोर्ट्स अशा एकूण 6 संघानी भाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये डी.पी. फायटर्स संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तर, बहिरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनेल संघ उपविजेता ठरला. तर, विक्रम ठाकूर (धुतूम), अमर म्हात्रे (मोरावे) व प्रतीक ठाकूर (बेलपाडा) यांनी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षणाची कामगिरी बजावली. या सर्वांना पारितोषिके देण्यात आली. कर्णधार दिगंबर कोळी यांच्या बहिरीनाथ कलाप्रेमी लेडीज देवयानी दिगंबर कोळी यांच्या संघानेने शो मॅचमध्ये विजय मिळवला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार कैलासराजे घरत, अष्टगंध कलामंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, कर्णधार दिगंबर कोळी आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच, या प्रीमियर लीगमध्ये सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चिंतामण शिवडीकर, राजेश खर्डे, रंजिता पाटील, साधन भोईर, वृषाली भोईर, विनायक, रश्मिता पोपेटा, आकाश म्हात्रे, रजनी मेढेकर, वैशाली म्हात्रे, विकिता म्हात्रे, राजश्री कोळी, उपासना घोसाळकर, दर्शना ठाकूर, सोमनाथ कोळी, स्पर्धेचे पंच हरिश्चंद्र फडके, लालचंद गावंड, राजेश पाटील, गुणलेखक सोमनाथ पाटील, समालोचक मनोज म्हात्रे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version