| महाड | वार्ताहर |
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरुनच महायुतीमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेनेना पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे हा गुंता सुटलेला नाही. दरम्यान, महाड दौर्यादरम्यान पत्रकारांनी रायगडचा पालकमंत्री कोण? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान करीत रायगडचे पालकमंत्री मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचे सांगत स्पष्ट बोलणे टाळले. त्यामुळे अद्यापतरी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही, असेच म्हणावे लागेल.