खालापूरात अमृत कलशाचे स्वागत

| रसायनी | प्रतिनिधी |

खालापूर पंचायत समिती व तालुक्यातील 44 ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून निघालेल्या अमृत कलश यात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेत विद्यार्थी यांच्या देशभक्ती गीत, वारकरी संप्रदायाचा भजन, शासकीय महिला कर्मचारी,सरपंच, सदस्यांनी पंचायत समितीच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या काढून स्वागत केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवारातील चिमुटभर माती आणि शिवारात पिकवलेके तांदूळ एकत्र कलशात घेऊन अमृत कलशाची फेरी काढण्यात आली होती. तो कलश वाजत गाजत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या यात्रेत गटविकास अधिकारी संदीप कराड, शिक्षण अधिकारी चोरमोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रोकडे, विस्तार अधिकारी शैलेन्द्र तांडेल, महादेव शिंदे, अधीक्षक चोपडे, गीतांजली पुरी, वर्षा हजारे, अभियंता चव्हाण,जाधव, कनिष्ठ सहायक भांडारकर, प्रशांत कदम, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत व पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version