मैत्री कट्टातर्फे विहिरीची साफसफाई

| उरण | वार्ताहर |

पिरकोन गावाची मोठी विहीर नावाने सुप्रसिद्ध असलेली मोठी विहीर अर्थात मोठी बाव आणि परिसराची साफसफाई फणसवाडी मैत्री कट्टा परिवार पिरकोन यांच्या श्रमदानातून करण्यात आली. सूर्यकांत गावंड, विलास गावंड, मंगेश म्हात्रे, राजा जोशी, प्रमोद जोशीं, प्रवीण जोशी, अभि पाटील, बाबू पाटील, विलास पाटील, केतन गावंड, सूरज घरत, प्रशांत गावंड, यतीश गावंड, प्रतीक घरत आणि विनायक गावंड आदी मैत्री कट्टा फणसवाडीचे पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झालेले होते.

Exit mobile version