पश्‍चिम बंगालच्या सराईत गुन्हेगारास अटक

। पनवेल । वार्ताहर ।

पश्‍चिम बंगाल परिसरात गुन्हे करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा व त्यानंतर ओवळे येथे वास्तव्यास राहणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या साथीने सापळा रचून ताब्यात घेतले.

नुकतेच सराईत गुन्हेगार मोतलीफ तारजेन शेख (36) याने तेथील सोन्याच्या पेढीमध्ये शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. तेथे लूटमार करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा नंतर ओवळे येथे वास्तव्यास राहिला होता. त्याचप्रमाणे इतर मोठ्या प्रमाणातील गुन्हे सुद्धा त्याच्यावर दाखल होते. त्यामुळे नकाशे पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान सराईत गुन्हेगार पनवेलजवळील ओवळे याठिकाणी एका चाळीत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे मदत मागितली. यावेळी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध पथकाने सुरु केला असता तो याठिकाणी सॅनट्रिंगची कामे करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन प. बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version