। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचीसुनावणी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्टातसुरु झाली. पहिल्या दीड तासांत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात घटनापीठ काय निर्णय घेणार, याबाबत आज काय निर्णय येतो, हे पाहणं महत्त्वाचंय. पण विशेष म्हणजे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी या दोघांच्याही युक्तिवादावेळी न्यायमूर्तींनी तीन वेळा सुनावणी थांबवली आणि एकमेकांशी चर्चा केली.
लंच टाइम नंतर कोर्ट धनुष्यबाण चिन्हावर निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वांचे या निर्णयाकडे लक्ष.