जानकरांचा भाजपला सवाल
बुलढाणा | प्रतिनिधी |
भाजप सरकार सत्तेवर असताना एसटीचे विलिनीकरण का करण्यात आले नाही,असा सवाल करीत माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपला घऱचा आहेर दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण? रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे.
आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा झालं नाही, जनतेनं हुशार होणं हाच मार्ग असल्याचं महादेव जानकर म्हणाले. त्यामुळं महादेव जानकर यांनी भाजपला एक प्रकारे घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जात आहे.