| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात मंगळवारी (दि.16) सकाळी लॅब्रेडोर जातीच्या पाळीव कुत्र्याने घोरपडीवर हल्ला केला. त्या कुत्र्याने घोरपडीला चावा घेऊन जखमी केले. प्रतिकार म्हणून घोरपडीनेही आपल्या शेपटीने कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, घोरपड अर्धमेली झाल्यावर कुत्रा शांत झाला. यावेळी उपस्थित निलेश कुदळे यांनी त्या कुत्र्याला आवरले आणि जखमी घोरपडीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी तत्काळ हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने घोरपडीवर प्राथमिक उपचार केले. काही तासांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा ठणठणीत झाली आणि अखेरीस वनक्षेत्रात तिला सोडण्यात आले.
कुत्र्याच्या हल्ल्यात घोरपड जखमी
