। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड एकदरा गायमुखवरील डोंगरावर संध्याकाळच्या वेळी वणवा लागुन मोठया प्रमाणावर आग पसरली होती.
या ठिकाणी पडलेला सुका पाळापाचोळा, वृक्ष आणि वाळलेल्या फांद्या असतात. या भागात जर वणवा किंवा आग लागली तर संपूर्ण परिसरात वणवा भयावह रुप धारण करतो. या वनव्यामुळे वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत. या तालुक्याला पर्वत, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दर्या इत्यादी नैसर्गिक वरदान स्वरुपात आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही. ऐन थंडीत वणवा लागला कि लावण्यात आला, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.