। गडब । वार्ताहर ।
शेतकर्यांच्या अस्तित्व टिकले पाहिजे, शेतकर्यांच्या बाजूने असणार्यांना मतदान करा, शेतकर्यांना विरोध करणार्यांना मतदान करू नका, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी गडब येथे केले. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनंत गीते यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते याच्या प्रचारसभेचे आयोजन गडब येथे करण्यात आले होते. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासह लोकसभेचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, सहसंर्पक प्रमुख किशोर जैन, समन्वय नरेश गावंड, उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, विभाग प्रमुख गजानन मोकल, शेतकरी शेतकरी संघर्ष समितीचे के.जी. म्हात्रे, गजानन पेडवी, सुशील कोठेकर, दिगंबर पाटील, लक्ष्मण कोठेकर, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, काँग्रेसचे पेण तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शेकापचे पी.डी. पाटील, लक्ष्मण गांवड, युवासेनेचे निशांत पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिसरात एमआयीसीमार्फत भूसंपादन होत आहे, त्या भूसंपादनाला शेतकर्यांचा विरोध आहे. येथील शेतकर्यांचा विकासाला विरोध नाही; परंतु शेतकर्यांना विश्वासात घेतले पाहिजे, दलाली करणार्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. तुम्ही गीतेंना मत देत नाही, तर जयंत पाटलाला मत देताय, आपल्याला शेतकर्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, शेतकरी संघर्ष समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावाचा विकास झाला पाहिजे, शेतकरी संघर्ष समितीला राजकारणात आणत नाही; परंतु हा शेतकर्यांचा लढा जे शेतकर्यांच्या बाजूने आहेत, त्यांना शेतकरी मतदान करतील. तटकरेंनी विश्वासघात केला आहे. अनंत गीते सर्वसामान्य उमेदवार आहेत, ते विजयी होतील, असे आ. जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनंत गीते यांनी आपल्या भाषणात शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर, ही निवडणूक भावी पिढीचे आयुष्य घडविणारी आहे. भाजप संविधान बदलायला निघाले आहे, आपल्याला सिंवधान वाचवयाचे आहे, यासाठी अनंत गीते यांना विजयी करा, असे अवाहन शिवसेनेचे संर्पक प्रमुख विष्णु पाटील यांनी सांगितले. जे शेतकर्यांच्या बाजूने आहेत, त्यांच्याबरोबर शेतकरी राहातील, असे शेतकरी संघर्ष समितीचे के.जी. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
शेतकर्यांना न्याय मिळवून देणार: आ. जयंत पाटील
