राज्य स्तरावर मोर्चेबांधणी बैठक
पनवेल | वार्ताहर |
राज्यात बेन्जो बँड नाशिक ढोल या शुभकार्यात रोडवर व इतरत्र वाजवणार्या कलाकार असंघटित आहेत. त्यांना एकत्र आणण्यासाठी पनवेल येथे सुनील वानखेडे यांनी पनवेल तालुका स्तरावर बैठक पनवेल शेकाप कार्यालयात येथे संपन्न झाली.
या बैठकीत पनवेल परिसरातील तसेच मुंबई चेंबूर परिसरातील बेन्जो पार्टीचे कलाकार उपस्थित होते. यात सर्व बेन्जो, बँड, नाशिक ढोलच्या कलाकारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असून, आगामी काळात मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी अशा बैठका घेऊन सर्व कलाकारांना एकत्र आणून एक कलाकारांची हिताची एक नाव ठरून रजिस्टर करण्याचा मानस असून, विभागानुसार कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. आतापर्यंत विखुरलेले, शासकीय योजनेपासून लांब राहिलेले त्यांना न्याय्य हक्कासाठी व मूलभूत प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
या बेन्जो कलाकारांना शेकाप नेते देवा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांनी कलाकारांच्या सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले असून, पुढील काळात बेन्जो वादक कलाकारांच्या पाठीशी शेकाप पूर्णपणे पाठीशी असेल, असेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित बेन्जो बँड नाशिक ढोल वादक कलाकार सुनील वानखेडे, अजय मातोड, रमेश काळे, सचिन आठवले, सुरेश जाधव, बाळा जाधव, रोहित पवार, वैभव घोलप, शुभम सातपुते, अन्सार फक्की, विजय पगडे, प्रसाद शिरधनकर, जितू वाहूळे, सचिन कांबळे, अमित जाधव, सुशांत वळंजू, रुद्धश गोवारी, सिद्धांत कांबळे इत्यादीच्या उपस्थित बैठक पार पडली.