| बारामती | वृत्तसंस्था |
उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे. बाहेरील कोळसा राज्यातील पॉवर पॉईंटला जास्तीच्या प्रमाणात चालत नाही. मात्र, परदेशी आणि देशी कोळसा वापरून विजेचे संकट दूर करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते बारामती तालुक्यातील कोर्हाळे खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, राज्यात 3 ते 4 हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. विजेची मागणी लक्षात घेता शेजारील राज्यातून वीज विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. धरणातील पाणी पाऊस पडेपर्यंत शेतीला राखून ठेवण्यात येणार असून, उर्वरित पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच आपण जी वीज वापरतो त्याचे बिल भरलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.