बापरे! मुरुडमध्ये चेटकिणीचा वावर; व्हीडीओ व्हायरल

| अलिबाग | प्रतिनिधी |

चेटकिणीचा वावर मुरुड तालुक्यातील सायगावमधील फार्महाऊसमध्ये असल्याचा संशयास्पद व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमुळे गेल्या चार दिवसांपासून सायगाव भितीच्या छायेत असल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होऊन बसले आहे. मात्र सायगावमधील शेकापचे राहिल कडू यांच्या सतर्कतेमुळे व्हीडीओ व्हायरल करणाऱ्याला दणका मिळाल्यावर त्याने ही घटना मुरुड तालुक्यातील सायगावमधील नसल्याचे कबुल केले.

सायगावमधील एका फार्म हाऊसमधील पाच तरुण फिरण्यास गेले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या फार्महाऊसमधील स्वीमींग पूलमध्ये पोहत असताना, एका तरुणावर चेटकिणीने हल्ला करून त्याला जखमी केले. चेटकिणीच्या भीतीने तरुण बंद खोलीत लपून बसले होते. त्याठिकाणीदेखील खोलीच्या परिसरात चेटकिण फिरत असल्याचा व्हीडीओ व्हॉट्सॲप या सोशल मिडीयावर गेल्या चार दिवसांपासून व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ एका अज्ञात इसमाने व्हायरल करत रात्री दहा नंतर मुलांना फिरण्यास पाठवू नका, असे भिती वाटणारे व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले.

मुरुड तालुक्यातील सायगांवमधील ही घटना असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याचे गावांतील नागरिकांच्या लक्षात आल्यावर लहान मुलांपासून मोठ्या मंडळींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळनंतर घरातून कोणीच बाहेर पडण्यास तयार नव्हता. संपुर्ण गाव भितीच्या छायेखाली होता. ही बाब शेकाप मुरुड तालुका युवा अध्यक्ष राहिल कडू यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सोशल मिडीयावर बोलत असलेल्या व्यक्तीची माहिती घेतली. बिलाल असे या व्यक्तीचे नाव त्यांना असल्याचे समजले. त्या व्यक्तीचे नातेवाईक मुरुड तालुक्यातील आगारदांडा येथील असल्याचे समजले. कडू यांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून संशयास्पद व्हीडीओमुळे गावांत भिती निर्माण झाली आहे. व्हीडीओ व्हायरल करणाऱ्या बिलाल याला असे चुकीचे व्हीडीओ व्हायरल करण्यास सांगू नका, असे समज दिली. कडू यांच्या सतर्कतेमुळे शनिवारी सायंकाळी बिलाल याने तो व्हीडीओ सायगावमधील नसल्याचे कबूल केले. त्यानंतर सायगावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना समजताच घटनेची पडताळणी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक निशा जाधव यांना दिले. निशा जाधव यांनी गावांतील ग्रामस्थ, महिलांशी भेट घेऊन त्यांच्यामध्ये निर्माण झालेली भिती दूर केली.

अफवांवर विश्वास ठेवू नका
मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायगांवमधील फार्म हाऊसमध्ये एक संशयास्पद व्हीडीओ व्हायरल झाले आहे. या व्हीडीओमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हीडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असून हा इसम रोहामधील आहे. त्याचे नाव बिलाल असे आहे. रोहा पोलीस ठाण्यात त्याचा जबाब घेतला आहे. तसेच त्यानेदेखील चुकीचे व्हीडीओ असल्याचे कबूल केेले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे मुरुडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी आवाहन केले आहे.
Exit mobile version