खारघरमधून महिलेसह दोन वर्षांची मुलगी बेपत्ता

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर सेक्टर 5 परिसरातून 22 वर्षीय महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रशिदा फिरोजअली शेख या आपल्या दोन वर्षीय मुलीला सोबत घेऊन सेक्टर 5, खारघर येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या. त्या अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने पती फिरोजअली अब्दुल शेख यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version