। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शिरगाव-नाखवामोहल्ला येथे 31 ऑगस्ट रोजी एका महिलेला झालेल्या मारहाणीतील सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीन एजाज नाखवा, एजाज नाखवा, इम्रान नाखवा, खैरुन नाखवा, आतिफा इम्रान नाखवा, आफ्रीन एजाज नाखवा, अरसलान एजाज नाखवा अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडीत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली होती. यापैकी संशयित इमरान व अरसलानकडून लाकडी काठीने या महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच, शिरीन नाखवा हिने पीडीत महिलेच्या नाकाला चावा घेऊन दुखापत केली होती. तसेच, सर्वांनी मिळून या महिलेला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडीत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार असून पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.