। पनवेल । वार्ताहर ।
वाळवण टाकण्यासाठी चौथ्या मजल्यावरील पत्र्यावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील माणेेक नगर सोसायटी ए-1 मध्ये राहणार्या मिनाक्षी राजेंद्र देशमुख या नेहमीप्रमाणे सकाळी चौथ्या मजल्यावरील पत्र्यावर वाळवण सुकविण्यासाठी चढल्या असताना पत्रा फुटून खाली पडून त्यात त्या गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाल्या आहेत. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.