। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पीडित महिलेच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना फोनवरून तीचे अन्य व्यक्ती सोबत अनैतिक संबंध आहेत असे सांगून बदनामी केली. या प्रकरणी आरोपी राहुल राजेंद्रनाथ खन्ना (वय 45 राहणार सेक्टर 14, कोपरखैरणे) याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला पनवेल येथे राहत असून आरोपी राहुल खन्ना याने त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर पीडित महिलेच्या विरोधात पोलीस ठाणे आणि वेगवेगळ्या कोर्टात दाखल केलेल्या अप्लिकेशन मध्ये अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे नमूद केले आहे. तसेच पीडित महिला चरित्रहीन आहे असे प्रत्यक्ष बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राहुल खन्ना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.