| पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगाने आलेल्या कारने स्कूटीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी कारचालक विद्यार्थिनी विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथी सिंग असे तिचे नाव आहे.
अॅक्टिव्हा स्कूटी घेऊन गोपाळ यादव हे त्यांच्या पत्नीसह घाटकोपर येथील कामावरून पनवेल येथील घरी जात होते. ते स्कूटीवरून खारघर येथील हिरानंदानी ब्रिज उतरून पनवेलच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर आले. त्यावेळी कारचालकाने स्कूटीला खारघरजवळील हॉटेल हायवे ब्रेकर समोर धडक दिली. यात रेखा यादव, गोपाल यादव हे खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रेखा यांचा मृत्यू झाला.
कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606