दीड वर्षाच्या मुलासह महिला बेपत्ता

| महाड | प्रतिनिधी |

सासरी जाते सांगून सासरहून निघालेली विवाहित महिला शोध घेऊनही न सापडल्याने अखेर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्याची घटना महाड तालुक्यात नुकतीच घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नम्रता सुनील सुतार (24) रा. गोवेल, ता. पोलादपूर ही विवाहिता तिचा मुलगा स्वराज सुनील सुतार, दीड वर्षे याला घेऊन 8 ऑगस्ट रोजी गेली ती परत आली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळण येथे रक्षाबंधनकरिता ती मुलासह माहेरी आली होती. दि. 11 ऑगस्ट रोजी माहेरी घरातून निघताना तिच्या आईला मी सासरी जाते असे असे सांगून मुलासह निघून गेली होती. घरातून गेल्यापासून सदर महिलेचा संपर्क होत नसल्याने आणि नातेवाईकांसह इतर सर्वत्र शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर तिच्या नातेवाईकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार नोंदवली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेचा शोध सुरू असून, ही महिला कोणास आढळून आल्यास पोलिसांशी सहा.फौज. आर.के. गोरेगावकर 9423380063 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version