| पनवेल | वार्ताहर |
पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मानखुर्द रेल्वे स्टेशनदरम्यान कि.मी.27/127 जवळ पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिची उंची 5 फूट 4 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने गहू वर्ण, चेहरा उभट, नाक सरळ, दात शाबूत, केस काळे लांब असून, हातात लाल रंगाचा दोरा, अंगात काळ्या फुलांची डिझाईन असलेल्या टॉप, काळ्या रंगाची लेगीज घातलेली आहे. सदर जखमी महिला बेशुद्ध असून, सायन हॉस्पिटल मुंबई येथे उपचार चालू आहेत. तरी सदर जखमी महिलेची कोणी वारस नातेवाईक, मित्र मिळून आल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाणेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सहा पोलीस निरीक्षक दराडे 9822011744, पो.हवा मंडले 8108516222, बावस्कर 8806632575 यांच्याशी संपर्क साधावा.