अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शिवमंदिराजवळ परहुरपाडा अलिबाग येथे 35 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना शनिवारी (दि. 9) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
आरोपी परहुरपाडाचा रहिवासी असून पिडीत महिलेच्या शेजारी राहतो. आरोपीचे नाव अनिकेत अंतोष नाईक (22) असे आहे. पिडीत महिला ही घराच्या मागच्या अंगणात भांडी घासत असताना आरोपी फवारणीचा पंप मागायला आला व पिडीत महिला पंप आणण्यासाठी माळ्यावर गेली असता आरोपी तिथे अचानक आला व महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर सदर महिलेने आपल्या पतीला फोन करुन सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
सदर घटने बाबत अलिबाग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक पाटील करित आहेत.

Exit mobile version