| पुणे | प्रतिनिधी |
लग्नाचे वचन देऊन एका 34 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातून महिला दोनदा गर्भवती राहिल्याने तिला व तिच्या 7 वर्षीय मुलाला जिवे मारण्याची धमकी देत गर्भपात केला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्याची मागणी पीडितेकडून केली जात आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कोथरूड पोलिसांनी दत्तात्रय काळभोर (43), रा. बावधन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2022 साली पीडितेची आणि काळभोर याची एका मैत्रिणीमार्फत ओळख झाली. यानंतर दत्तात्रयने पीडितेला लग्नाचे वचन दिले. यादरम्यान आरोपीने शरीरसंबंध ठेवल्याने पीडिता दोनदा गर्भवती राहिली. यानंतर आरोपीने पीडितेला दोनदा कोथरूड परिसरातील हॉस्पिटलमध्ये नेत तिचा गर्भपात केला.