लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

| पनवेल | प्रतिनिधी |

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपी शिवाजी श्रीमंत वाघमोडे राहणार सेक्टर 25, कामोठे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान आरोपीने पीडित महिलेला लग्न करणार आहे असे खोटे सांगितले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पिडीतेने लग्नाविषयी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version