। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा गळा दाबून खुन करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे. संगीता नामदेव म्हात्रे (55) रा.कुंडेवहाळ असे या मयत महिलेचे नाव असून, त्या आपल्या घरी एकट्याच असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला व घरातील सोन्याची चेन, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातले असा मिळून जवळपास 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपींच्या शोधात रवाना केली आहेत. व काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महिलेचा गळा दाबून खून करून दागिने केले लंपास
