| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल बस स्टॅन्डसमोरील एनएमएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. वंदना गराडे या एनएमएमटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







