महिलेला ऑनलाईन गंडा ; ऑनलाईन मद्य खरेदी महागात

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
लग्नात पाहुण्यांसाठी लागणार्‍या सवलतीच्या दरातील ऑनलाईन मद्य खरेदी करणार्‍या महिलेला भामटयांनी गंडा घालत तब्बल दीड लाखाची फसवणूक केली आहे. गोंधळपाडा अलिबाग येथील रहिवाशी असणार्‍या या महिलेने पी के वाईन्स या पेजवर जाउन तेथील रजिस्टर मोबाईल नंबर वर फोन करून वाईन्सची ऑर्डर केली असता आरोपीने पैसे मिळाले नसल्याचे भासवत आपल्या खात्यावर वांरवार पैसे वळते करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे फिर्यादीना तब्बल 1 लाख 44 हजार 026 रूपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने उकळत फसवणुक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Exit mobile version