महिलांनी बाप्पासाठी बनविले कंठीहार

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील गोमाशी येथील सोमजाई माता महिला बचतगटातील महिलांनी बाप्पासाठी घरगुती सुशोभित कंठीहार विक्रीसाठी बनविले आहेत. सोमजाई माता महिला बचतगटातील महिलांनी एकत्रित येऊन सुशोभित, आकर्षक असे घरगुती कंठीहार तयार केले आहेत. हे हार ग्राहकांना अतिशय माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याची किंमत 80 ते 100 रुपये असेल. सुशोभित कंठीहार हवा असल्यास 9370274621 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बचतगटाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version