। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
पाली हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक दिवाळीतील खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने पालीतील बाजारपेठेमध्ये दाखल होतात. पाली बाजारपेठ दिवाळीनिमित्त सुशोभित आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फटाके यांनी बहरून गेली आहे. पालीतील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकातील निलेश खोडागले, नरेश बैकर यांच्या स्टँडर्ड फायर वर्क दुकानातून माफक दरात फटाके, पणत्या, आकाश कंदील, रांगोळी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. तसेच, दिवाळीमध्ये शाळकरी मुले मातीपासून किल्ले तयार करतात. किल्ले आकर्षक व शोभिवंत करण्यासाठी लागणारे मातीचे सैनिक, मावळे, पणत्या इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर पाली कुंभार आळीतील कलाकारांनी तयार करून माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. परीक्षा संपल्यावर बच्चेकंपनीने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी करतील, असे विक्रेत्याकडून सांगण्यात आले.





