रोजगार प्रशिक्षणातून महिला स्वावलंबी

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीत आयोजित केलेल्या महिलांना रोजगार शिबिरातून कमीतकमी दोन महिला तरी स्वावलंबी होत आपल्या कुटूंबाला मदतीचा हात देतील तेव्हाच खर्‍या अर्थाने समाधान लाभेल असे प्रतिपादन कर्जत खलापूर मतदारसंघाच्या युवती संघटक अ‍ॅड.प्रतीक्षा लाड यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने खोपोलीत महिलांसाठी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबीर आणि कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहराच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा सुमन औसरमल, मा. नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, शहर अध्यक्ष मनेष यादव, युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा महिला उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेविका केविना गायकवाड, वैशाली जाधव, लीला ढुमण, अलका शेंडे, सुनीता गायकवाड, महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, वैशाली पवार, दिपाली भोसले, अंजु सरकार, जयश्री डोंगरे, प्राजक्ता शिंदे यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version