महिलांनी आरोग्य जपून स्वयंपूर्ण व्हा

स्वप्ना कदम यांचे प्रतिपादन
| अलिबाग । वार्ताहर ।
मापगाव अलिबाग येथे स्व. उमेश दत्तात्रय थळे सभागृह ग्रुप ग्रामपंचायत मापगाव या ठिकाणी महिला आरोग्य व स्वयरोजगार शिबिर पार पडले. यावेळी वुई आर मोअरच्या ब्लू सफायर डायरेक्टर स्वप्ना कदम म्हणाल्या की, आज अनेक चुकीच्या गैरसमजुती, पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांची अनेक जबाबदार्‍यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देण्याची वाढत चाललेली अनास्था या सर्व गोष्टींमुळे मासिक पाळीतील आजार व समस्या वाढत चालल्या आहेत, त्यामुळे अशा वेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्यासह स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज आहे अशा त्या म्हणाल्या.

कार्यक्रमास मापगाव व परिसरातील सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात हसत खेळत प्रश्‍नोत्तरे, बक्षिसे, हळदी कुंकू आणि लकी ड्रॉ या गोष्टींमुळे रंगत वाढली. कार्यक्रमास मापगावंच्या सरपंच उनीता थळे,माजी सरपंच सुनील थळे, वुई आर मोअरच्या गोल्ड डायरेक्टर राजनंदिनी गायकवाड,वुई आर मोअरचे सिल्वर डायरेक्टर नंदू चव्हाण, के. व्ही.चांदोरकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री. हरवडे व नंदू चव्हाण यांनी केले.आभार प्रदर्शन शलाका थळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन वुई आर मोअरच्या अलिबाग टीमने केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रामुख्याने साक्षी राऊत यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version