महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत खालापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून कर्जत-खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षते खाली महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर, प्रदर्शन-विक्री तसेच हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कर्जत खालापूर मधील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. महिलांमध्ये असणार्‍या सुप्तगुण व व्यावसायिक प्रवृत्तीला वाव भेटावा हा या कार्यक्रमा मागच उद्देश होता.

अनेक बचत गटातून 70 हुन अधिक स्टॉल व 4000 पेक्षा जास्त महिलांनी यात समाविष्ट होऊन यात खाद्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, मसाल्याचे पदार्थ, कपडे, साड्या व इतर अनेक प्रकारच्या त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते. चूल व मूल वगळता स्त्रिया कशाप्रकारे व्यावसायिकदृष्ट्या देखील समाजात अग्रेसररित्या प्रगत आहेत याचे दर्शन या माध्यमातून समाजाच्या पुढे आले. थोरवे फाऊंडेशनद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अजून विविध प्रकारचे उपक्रम या कार्यक्रमात राबवण्यात आले. महिलांचा अजून द्विगुणित व्हावा या साठी लकी ड्रॉ च्या कार्यक्रमातून पैठणी वाटपाचा कार्यक्रम देखील पार पडला.

Exit mobile version