महिला आणि कुमार गट कबड्डी स्पर्धा

रा. फ. नाईक महिलांमध्ये , तर ग्रिफिंस जिमखाना कुमार गटात उपांत्य फेरीत


| ठाणे । वृत्तसंस्था ।

शिवप्रबोधान मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत महिलात रा. फ. नाईक, तर कुमार गटात ग्रिफींस जिमखाना संघाने उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने ठाणे पश्‍चिम येथील स्वा. सावरकर मार्ग महानगर पालिका शाळा क्र. 120 च्या पटांगणात आयोजित केलेल्या या स्पर्धेतील महिला गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात रा. फ. नाईक संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत जय अंबे संघाला 34-33 असे चकवित उपांत्य फेरी गाठली.

सुरवातीपासून अटीतटीने खेळला गेलेल्या या सामन्यात गुणफलक सतत दोलायमान अवस्थेत होता, तर कधी तो बरोबरीत जात होता. शेवटी रा. फा. नाईकने एका गुणाने बाजी मारली.कुमार गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात ग्रिफिंस जिमखाना संघाने राजर्षी शाहू संघाला 31-24 असे नमवित उपांत्य फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत ग्रिफिंस् जिमखान्याने पूर्वार्धात एक लोण देत 10 गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सुर सापडलेल्या राजर्षी शाहू संघाने कडवी लढत देत सामन्याची रंगत वाढविली. पण पूर्वार्धात असलेली आघाडी शाहू संघाला जड गेली. शेवटी ग्रिफिन्स संघाने 7 गुणांच्या फरकाने बाजी मारली. या अगोदर झालेल्या महिलांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात ओम् वर्तकनगरने संघर्ष मंडळाला 39-27 असे नमवित, तर कुमार गटात नागेश्‍वर हेल्थ क्लबने जय बजरंगला 31-26 असे पराभुत करीत आगेकूच केली.

Exit mobile version