16 सप्टेंबरला अलिबागेत सुनावणी
। अलिबाग । वार्ताहर ।
महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारीफ या उपक्रमांतर्गत 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.
रायगड येथील पोलीस ठाणे आवारातील महिला समुपदेशन, सहाय्य कक्ष, भरोसा सेल तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयातील रायगड जिल्ह्यांच्या तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणे या जनसुनावणीत ठेवण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
राज्य महिला आयोगामार्फत आयोजित या जनसुनावणीकरिता जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी क्षेत्रातील समस्याग्रस्त महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव (7798171777 / 9970122623) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.
महिला आयोग आपल्या दारी उपक्रम
