यंदा चार प्रदर्शनीय सामने बीसीसीआयची घोषणा
। मुंबई । प्रतिनिधी ।
बीसीसीआयची पुढील वर्षीपासून महिलांच्या आयपीएल क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे, असे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. याचप्रमाणे एक वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे चार प्रदर्शनीय सामने होणार आहेत.
महिलांचे आयपीएल सुरू करण्यात दिरंगाई केल्यामुळे टीका होत असलेल्या बीसीसीआयला आता वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर गांगुली यांनी दिली.
पुरुषांच्या आयपीएलचे साखळी सामने चालू असताना तीन महिला संघांमध्ये चार प्रदर्शनीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या हंगामात पाच ते सहा संघांचा समावेश असू शकेल, परंतु यासाठीसुद्धा सर्वसाधारण सभेची मंजुरी लागेल, असे आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. प्रदर्शनीय सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता आहे.
चौकट
प्रसारण हक्काची निविदा लवकरच
2023 ते 2027 या कालावधीसाठी ङ्गआयपीएलफच्या प्रसारण हक्काची निविदा लवकरच जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय समितीच्या सभेत चर्चा झाली. 2018 ते 2022 या चार वर्षांसाठी स्टार इंडियाने 16,347.5 कोटी रुपये रकमेला हे हक्क प्राप्त केले होते. परंतु लीगची लोकप्रियता आणि दोन वाढीव संघांमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे प्रसारण हक्क 40 हजार कोटी रुपये रकमेपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.