आ.जयंत पाटील यांच्या हस्ते उद्धाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सराई,ता.अलिबाग येथे ओम साई क्रिकेट संघाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या स्पर्धेचे उद्धाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (26 मार्च) करण्यात आले.या स्पर्धेत 24 संघांना प्रवेश देण्यात आला आहे.या उद्धाटन सोहळ्यासाठी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर,शेकाप नेते संदीप घरत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.रविवारी या स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे.