खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा प्रतिसाद

| उरण | वार्ताहर |

पाले, ता.उरण येथील ग्रामदेवता यात्रेचे औचित्य साधत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालक, निवेदक नितेश पंडित, डान्स कोरिओग्राफर,पपण पाटील, निवेदक श्याम ठाकूर प्रस्तुत खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजू मुंबईकर, संगिता म्हात्रे, सत्यवान भगत, समाधान म्हात्रे, रुपेश भगत, चंद्रकांत गावंड ,अनिल घरत,अमित म्हात्रे, रामकृष्ण म्हात्रे, हनुमंत म्हात्रे आणि मंडळालातील सर्व सदस्य , महिलां भगिनी व पाले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळ पैठणीचा या कार्यक्रमात पैठणी खेळात प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्या दर्शना विनायक म्हात्रे तर उपविजेत्या ठरल्या त्या संजीवनी उपेंद्र म्हात्रे. या खेळात विजेत्या ठरलेल्या वहिनींसाठी खास बक्षिस म्हणून सुंदर अशा भरजरी पैठणी संगिता म्हात्रे यांच्या कडून देण्यात आल्या.

Exit mobile version