‘जेएनपीए’विरोधात कामगारांचा एल्गार

कामगार एकता संघटनेची जोरदार निदर्शने
| उरण | वार्ताहर |

जेएनपीटी कामगार एकता संघटनेनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी जेएनपीए प्रशासनाविरोधात प्रशासन भवनासमोर अनेक प्रश्‍नांबाबत जोरदार निदर्शने केली.

जेएनपीटी बंदरांतर्गत कामगारांच्या हितासाठी काम करणार्‍या जेएनपीटी कामगार एकता संघटनेने बुधवारी बंदर प्रशासन भावनासमोर निदर्शने केली. यावेळी जेएनपीटी हॉस्पिटलसंदर्भात असणार्‍या अनेक प्रश्‍नांबाबत उहापोह करण्यात आला. तर आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाकडे दाद मागण्यात आली. याबाबतचे निवेदन जेएनपीए अधिकारी जयंत ढवळे यांना कामगारांच्या वतीने देण्यात आले. यावेळी जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष दिनेश पाटील आणि न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह गणेश घरत, भगत, किरण जिकमिडे, राजेश कडू, संदीप पाटील, वाजेकर, अशोक घरत आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version